Latest Attitude status in marathi For Whatsapp 2026.

नमस्कार मित्रांनो आपल्या जीवनामध्ये एटीट्यूडची भूमिका खूप मोठी आहे. आपण कोणत्या प्रकारच्या एटीट्यूडमध्ये जीवन जगतोय हे आपल्या पुढील आयुष्य ठरवत असते. तुमचा एटीट्यूड पॉझिटिव असो किंवा खुन्नशी असो तुमचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला कामी येत असतो. प्रत्येक माणसांमध्ये एक सकारात्मक एटीट्यूड असणे गरजेचे आहे त्याशिवाय तो प्रगती करू शकत नाही.
आयुष्यात बऱ्याचदा आपल्याला समोरच्या व्यक्तीला प्रत्युत्तर करणे हे गरजेचे असते, अशा वेळेस आपण जर एक चांगला स्टेटस ठेवून त्याला उत्तर दिले तर आपल्या भावना योग्य शब्दात त्यापर्यंत पोहचतात. आजच्या पोस्टमध्ये असेच काही खतरनाक एटीट्यूड कॅप्शन, स्टेटस, फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्याद्वारे तुम्ही समोरच्या व्यक्तीला नक्कीच गार करू शकता.
अधिक वाचा :- Birthday Wishes In Marathi
बेस्ट अक्कड स्टेटस मराठी / Best Attitude Quotes In Marathi.

इज्जत दिली तर इज्जत मिळेल, पण नखरे दाखवले तर…
“मला काय घंटा फरक पडत नाही, तुमचं तुम्ही बघा!”🤙
जेव्हा समोरचा माणूस त्याच्या बोलण्याची मर्यादा विसरतो,
तेव्हा त्याला त्याची जागा दाखवण्यात कधीच कमीपणा ठेवायचा नाही!😀
माझ्यावर खूप लोक जळतात, पण कोणीही माझं काही उखाडू शकत नाही!
हक्कासाठी उभं राहायला काळीज लागतं,
पण चाटुकार होण्यासाठी फक्त जीभ पुरेशी असते!
घाणीत दगड मारला की अंगावरच उडतो… 🤫
म्हणून मूर्खांकडे थेट दुर्लक्ष करायचं! ❌
आपलं मौनच त्यांची लायकी दाखवण्यासाठी पुरेसं असतं! 😎🤙
#Attitude_Matters 👑💯
वेळेनुसार स्वतःला बदलावं लागलं…
कारण स्वच्छ मनाचे लोक लोकांना सहन होत नाहीत! 👊
काही लोक सोबत असतात पण त्यांची साथ खोटी असते, फक्त वरून आपलेपणा दाखवून आत विश्वासघाताची आखणी मोठी असते !
आज गरज आहे तेव्हा कोणीच नाही,
उद्या सगळेच असतील… पण तेव्हा गरजच उरणार नाही. 💯
#भावकी
माझ्या आई-वडिलांचा झालेला अपमान
मी 1000% परतफेड करणारच.
तुम्हाला वाटत असेल “रात गेली, बात गेली”
तर लक्षात ठेवा…
ते माझ्या History मध्ये कधीच नव्हतं आणि नसणारही नाही. 😏🔥
Royal attitude status in marathi.
सगळ्यांना वाटतं माझं काहीच होऊ शकत नाही, Comeback तर मुळीच नाही म्हणे…
पण त्यांना काय माहित इकडे Comeback नाही,
इकडे तर पूर्ण आयुष्य Prime mode मध्ये उभं करतो.
”शांत होतो तोपर्यंत ठीक होतं, पण आता ज्यांनी मला त्रास दिलाय त्यांना त्यांचं आयुष्य नर्क कसं असतं हे मी दाखवून देणार! 🦁🔥🗡️”
आमच्या चेहऱ्यावरची हसणं पाहून…
लोकांच्या मनातील जळणं आणखी वाढते…!!
इथपर्यंत येत असताना मी खूप काही गमावलं, त्यामुळ कोणाला गमवायला मी कधीच घाबरत नाही..!
आयका माझ्यासारखे शंभर भेटतील पण त्या शंभर मध्ये मी नसणार..!! 💀🤙🔥
डोक फिरल्यानंतर मी जेल आणि बेल या दोघांचाही विचार करत नाही.
“कोणी विचारलं, सध्या काय करतोस?
मी म्हणालो—प्रेम आणि विश्वास सोडून सगळं करतोय.”
आयुष्यात आनंदी राहायचं असेल, तर आधी त्यांना विसरावं लागेल,
जे तुम्हाला विसरून गेले आहेत.😶
शप्पत आहे की….
लग्नाचा तिलक लावायच्या आधी Fourtuner ला तिलक लावेल.
आजकाल काही लोकांना अस वाटत की त्यांची कारस्थान
आम्हाला माहितच नाहीत, स्वतः ला हुशार समजा ओ पण दुसऱ्याला येवढं पण मूर्ख नका समजू…!!
🤫💯🙏
जो तुम्हाला दुर्लक्षित करतो,
त्याला दिसणं सोडून द्या!
Killer attitude status in marathi

आमच्या वाट्याला तुटणं, विखुरणं, उद्ध्वस्त होणं सगळं येईल,
पण कधीच झुकणं नाही…!!
”नाव कमवायला काळजाचा पाणी करावं लागतं… ⚔️ कॅमेऱ्याचे फिल्टर चेहरे साफ करतील, पण तुमचं ‘कॅरेक्टर’ सिद्ध करायला स्वतःच लढावं लागतं! 🚩💯”
आयुष्य एकच आहे, आणि ते मी ‘मी चांगला आहे’ हे सिद्ध करण्यात फुकट घालवणार नाही. ‘माणूस’ म्हणून बघाल तर ठीक आहे, पण जर नडलात तर समोर साक्षात ‘सैतान’ उभा आहे असं समजा! 💀🔥
खरा सूड म्हणजे आरडा ओरडा नाही तर शांतपणे नातं तोडणं.
प्रतिसाद न देता, हळूहळू नाहीसं होणं…. हेच त्यांच्या मनावर थंड पण घातक उत्तर असतं.
सूड ओरडून नाही, शांतपणे घेतला जातो.
समोर गोड बोलणाऱ्यांची आणि मागे खंजीर खुपसणाऱ्यांची 🔪
गरज आपल्याला काल पण नव्हती आणि आज पण नाही!
आपल्याला ‘माणसं’ हवीत, ‘सरडे’ नाहीत! 🦎🔥
लय हवेत उडू नये माणसाने,
कारण मूताची पिचकारी कितीही लांब गेली तरी
शेवटचा थेंब चड्डीत पडतो..!!
दोन तोंडाची माणसं माझ्या खुप डोक्यात जातात कारणं कुठला चेहरा सगळ्यात आधी कानफडावा हेच समजत नाही… 💯🥀☹️
लोकांच्या बैठकी मध्ये बसून आमच्या बदल बोलणाऱ्यांनी पहिली स्वतःची बैठक नीट बसवा… तुमच कसं झालय अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ..!
आमाला तुमच्या गत सवयी नाहीत वाईट वेळ आली कि आमचं चोळायचं आणि चांगली वेळ आली कि दुसऱ्या खाली लोळायचं..!!
#बाप बदली संघटना
संस्कार गेले तेल लावत, जो आमच्यासोबत वाईट वागेल त्याचं घर आम्हीही उध्वस्त करू..!
चला आज थोडं हसून घेऊया,
माचिसशिवाय काही लोकांना थोडं “जळवू” या!
काही जण आमच्या आयुष्यातून निघून गेल्यावर त्यांना वाटायला लागलं की आता मी खचून जाईल तुमचा माहितीसाठी सांगतो तुमच्यावर अवलंबून मी काल पण नव्हतो आणि आज पण नाहीये…!
चाहणारे कमी असले तरी चालेल,
पण जळणारे कमी होता कामा नयेत…!!
bhaigiri status marathi attitude

कस आहे ना बाळा प्रश्न आई, बापाच्या इज्जतीचा आहे नाहीतर तू काय लय मोठी तोफ नाही तुला तर
#तुला तर चालता फिरता गायब केला असता..!!
#टीप: समजणे वाले को इशारा कोपी है..!!
”माझ्यासमोर खोटं बोलून काय फायदा नाही, तुझी हालचाल बघून तुझी कुंडली काढायची ताकद ठेवतो मी!”
इज्जत दिल्यावर माज येतो लोकांना म्हणुन झेलायची सवय सोडा आणि कोलायची सवय लावा..!!
#बोलले तर बोला नाही तर सरळ सरळ कोला.
मी जखमी आहे म्हणूनच घातक आहे,
हृदयातही आणि मेंदूतही
मी तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढेच आहे. 😏🔥
गाढवाला कितीही जीव लावला तरी त्याची लाथ मारायची सवय सुटत नाही तशीच आपल्या आयुष्यात काही माणसं असतात त्यांना कितीही जीव लावत तरी ते त्यांची लायकी दाखवल्याशिवाय राहत नाही…!
बादाम खात जा भावड्या,
आपली औकात विसरू नकोस… 😏
गर्दीत चमकण्यासाठी गोंगाट आवश्यक नसतो,
काही जण शांतपणेच योग्य वेळ येताच सगळ्यांवर भारी पडतात… 😌🔥
गुन्हेगारी शायरी मराठी

“मी जन्मलो होतो सामान्य माणसांसारखा, पण लोकांच्या घाण नजरा, खोटं प्रेम, आणि पाठीतले घाव ह्यांनी मला “गुंड” बनवल! मी गुंडगिरी शिकली नाही…
ती माझ्या प्रत्येक अपमानातून आपोआप जन्मली!”
सगळ्यांच्या दोन तोंडाची फिल्म आमच्याकडे आहे,
वेळ आली की तीही रिलीज करूच!
चार पैसे हातात आले म्हणून लगेच हावेत उडू नका, कारण हावेत उडालेला कचरा सुद्धा हावेने सात सोडली की जमिनीवरचं येऊन पडतो बरं का ..!
चार लोक काय म्हणतील याची आता भीती वाटत नाही…
भीती फक्त याची आहे, की त्या चार लोकांना मी काहीतरी म्हणू नये!
उगच आमची बदनामी करू नका जर का
आम्ही सुरुवात केली ना
सोसणार नाही तुम्हाला,
म्हणून बोलताना जर तोंड सांभाळून बोला..!
लोकांचे कान भरणाऱ्या आणि काड्या
करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवायचं एक दिवस असा पण येतो जेव्हा कान भरणाऱ्यांच पण कानफाड फोडण्यात येत…!
गावकी – भावकी जळत असती म्हणणा-यांनो, वेळ आल्यावर गावात भावकी अन् गावाबाहेर गावकीच कामाला येते.
😎 Attitude
जितका चेहरा आणि औकात परवडेल
तेवढाच दाखवा,
कारण जास्त दाखवलेला अॅटिट्यूड
शेवटी स्वतःवरच भारी पडतो.
🔥 वातावरणच असं झालंय की,
सिंह शांत बसलेत
आणि कुत्र्यांनी मात्र गोंगाट माजवला आहे.
Attitude status in marathi for boy

खायला प्यायला अन फिरायला दुसऱ्यां लोकांसोबत जातो आणि गरज लागल्यावर आमच्याकडं येतो
#व्हय रे बाप बदल्या..! 😂💯
”स्वभावात नेहमी थोडा गरमपणा ठेवावा… 🌋🦅
कारण इथे थंड पडलेल्या माणसांची लोक लायकी काढायला वेळ लावत नाहीत! ⚡🤙”
कोणावरही विश्वास ठेवू नका,
जीवन बनावट लोकांनी भरलेलं आहे.
विश्वास ठेवा माझ्यावर… मी स्वतःचे प्रॉब्लेम सोडून दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम चे 36 solution सांगू शकतो.
माझी फक्त एकच जिद्द आहे…
चूक नसताना कधीच कोणासमोर झुकणार नाही!!
अस्तित्व स्वतःच्या मेहनतीने निर्माण होते, पाय चाटून कोणी पण ओळख मिळवेल!
तुम्हाला बदनामी करण्याचा हक्क आहे…
कारण बरोबरी करण्याची क्षमता तुमच्यात नाही..!
ज्या प्रत्येक व्यक्तीमुळे तुमचा वेदना वाढते, त्याला नक्की सोडा!
एका ताटात जेवून जे विरोधात गेले, त्यांना आम्ही मनातून काय… आयुष्यातूनच परमनंट डिलीट करतो! पुन्हा संबंध येणे केवळ अशक्य…!! ⏳🦁❌
कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेऊ नका,, कारण बोलणारा कोण वेगळाच असतो.. आणि सगळी सुत्र हलवणारा वेगळाच असतो त्यामुळे विश्वास फक्त स्वतःवरच ठेवा..!!
मी तुमच्यासाठी स्वतःच वाटोळे करून घेऊ शकतो तर स्वतःसाठी तुमचं काय करेन याचा विचारच करा फक्त..🤬
फरक तर आधी पडायचा, आता तर आम्ही समोरच्याकडे लक्ष देणं सुद्धा सोडलंय..!
“आज जे पाप तुम्ही हसत-खेळत करत आहात, त्याची किंमत उद्या रडून मोजावीच लागेल; कारण निसर्ग कोणाचीच उधारी ठेवत नाही.”
Smile attitude status in marathi.

लोक माझ्यात दोष शोधतात, जणू स्वतः देवाच्या जागी बसलेले आहेत!
१००₹ खर्च करायला जीव खालीवर होतो तुमचा आणि स्टेटस तर असे ठेवतात जसे काय अंबानी बाप आहे तुमचा..!!😈
वाद घालणं तर कधीच सोडलंय… आता थेट ‘दुर्लक्ष’ करायचं! 🤐❌
कारण आपण शांत राहिलो ना, की समोरचा स्वतःच्याच लायकीनुसार खाली पडतो… 😎🤙
#Fact 👍
कोकीळ तर उगाच बदनाम आहे,
खरा गोड आवाज तर ‘उधार’ मागणाऱ्यांचा असतो! 🤐💸
”खिशाची खोली मोजणारे खूप भेटतील, पण मनाची श्रीमंती समजायला संस्कार लागतात. दुर्दैवाने, काहींच्या बाबतीत तिथेच मोठी ‘कमतरता’ असते.”
भावा तु आजकाल
गुंडागिरीवाली
STORY
नाही टाकत
कुठं मजदूरी चं काम करायला लागला काय..
”इज्जत कमवायला स्वतःचं कणा लागतो…
चमचेगिरी करणाऱ्यांना आणि निष्ठा बदलणाऱ्यांना,
मार्केटमध्ये किंमत कधीच मिळत नाही! 💯🔥”
जो जसा नजरेने पाहतो मी तसाच आहे , म्हणतात ना, जशी दृष्टि तशी सृष्टी…!!!!!
आम्ही बदलणार नाही
आणि आमचे शौकही नाही…
ज्यांना त्रास आहे
त्यांनी सरळ BLOCK करावं. 🚫😎
दुसऱ्याला…
नाव ठेवतांना आपली स्वतःची काय लायकी आहे हे बघूनच दुसऱ्याला नाव ठेवावी उगचं लय धुतल्या तांदळासारख असल्यागत वागू नये..!!
जशी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नसतं,
तसंच प्रत्येक माणूस आपल्या सारखा नवाब नसतो.
माझ्याबद्दल वाईट तेच बोलतात…
ज्यांच्याबद्दल मला विचार करायला पण आवडत नाही…!!😇
ज्यांनी मध्य समुद्रामध्ये तुमची साथ सोडली.. त्यांना, तुम्ही किनाऱ्यावर कसे आलात हे विचारण्याचा अधिकार कधीच नसतो..! #आणि हि गोष्ट समुद्रासाठी नव्हती..!
माझा भूतकाळ माझा पाठ सोडत नाही, मला भीती वाटते की,
मी पुन्हा एकदा शैतान होऊन जाईन.
Attitude status in marathi for instagram
काही लोक आमच्याजवळ होते फक्त तेव्हा, जेव्हा त्यांच्याकडे दुसरे कोणी नव्हते!
सहन करण्याची ताकद ठेवतो, तेवढच उध्वस्त करण्याचं धाडसही ठेवतो..!
हिशोबात रहा बाबा, आम्ही संयमात आहोत, कब्रेत नाही!👻
”आम्हाला संघर्ष करण्याची इच्छा नाही, मात्र युद्ध पुकारलेच, तर पराभव स्वीकारणे आमच्या रक्तात नाही..!!”
ज्यांना शांत राहणं आवडतं, ते खरे तर डरपोक नसतात, तर ते शक्तिशाली असतात!
जर वाईट काही घडत असेल, तर लगेच मी दोषी…
कारण माझ्या रक्तातलं हरामपणच त्याला आमंत्रण देतंय.
जिथे वाईट घटना येतात, तिथे मीच त्या घटनेचा निर्माता आहे असं मानणं माझ्या मनाचं एक व्यसन बनलाय आता…!
इज्जत असेल तरच नातं टिकेल, 🤝🔥
नाहीतर फालतू गर्दी गोळा करून स्वतःची व्हॅल्यू कमी करायची आपल्याला गरज नाही…! ❌😎 #Attitude
लोक जेव्हा तुमच्यात दोष शोधण्यातच गुंतून राहतात,
तेव्हा समजून घ्या, तुमची चमकच त्यांना अस्वस्थ करत आहे.
कारण उजेड जास्त झाला की सावल्या आपोआप दिसू लागतात.☠️
”नावं तर खूप आहेत ओळखीची, पण जे सोबत आहेत तेच आपले ‘खास’ आहेत!”
attitude quotes in marathi for girl

लोकांसारखं खोटं दिखावं करत नाही,
चांगली-वाईट जशीही असेन, पण ऑरिजिनल आहे!
”रस्त्याने चालताना भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर दगड मारत बसलात, तर ध्येयापर्यंत कधीच पोहोचणार नाही… दुर्लक्ष करायला शिका, तुमची प्रगतीच त्यांना चोख उत्तर देईल.” 🤫🚀
मी माझ्या राज्याची राणी स्वतः आहे, कोणाच्या संपत्ती पाहून कधीही मान खाली करत नाही…!!
मी इतकी वाईट की कोणताही सुधारू शकत नाही,
आणि इतकी चांगली की कोणीही बिघडवू शकत नाही…!!
तुम्ही तुमचा Attitude तिला दाखवताय, जिच्या मासूमियतचे लाखो चाहते आहेत…!!
मी आता इतकी विषारी झालेय की…
कुणाच्या गोड बोलण्याचाही परिणाम होत नाही!
मी शांत बसते, ज्यामुळे नाटक होऊ नये…
पण लोकांना माझ्या शांततेतही कटकारस्थान दिसते!
”आम्ही कालही भारी होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार…
काळजी त्यांनी करावी जे बोलतात एक, करतात दुसरं आणि दिसतात काहीतरी वेगळंच!”
रॉयल मराठी स्टेटस
जिथे चूक नसतानाही मला झुकावं लागेल,
तिथे मी चांगले-चांगले संबंधही तोडून टाकते…!!
वय लहान आहे, पण जग झुकवण्याचं सामर्थ ठेवतो!
दिलेली वचनं आणि मदतीला आलेला माणूस, या दोन गोष्टी कधीच विसरत नाही!
परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार भीक मागणारे नसावे!
हजारों दु:खं आली तरी माझी वृत्ती बदलू शकत नाही, काय करणार सवयच आहे हसत राहण्याची!
Marathi caption For instagram for boy attitude
तुझी लायकीच नाही की माझ्याशी लायकीवर चर्चा करशील!
भावनांचा अंत करून, मी भावनाशून्य झालो आहे…!
पोहच खूप मोठी आहे, पण दाखवण्याची सवय माझी नाही.
मी झुकलो तर समस्या सुटेल, पण त्यामुळे माझ्या स्वाभिमानाला धक्का बसेल.
खोटी सहानुभूती कधीच दाखवली नाही, ज्याच्यासाठी काही करतो, मनापासून करतो.
सल्ला नेहमी हरलेल्याकडून घ्या,
जिंकणारे अडचणी सांगत नाहीत… ते फक्त विजय दाखवतात. 🧠⚔️
विरोधक मराठी स्टेटस
धूळ कितीही उंच उडाली,
आकाश कधीच मळकट होत नाही… 🔥
“गोंधळ तर कोणीही घालतं, पण आम्ही शांत राहून पूर्ण ‘साम्राज्य’ उभं करण्यावर विश्वास ठेवतो..!” 🏰⚔️💯
स्वतःहून सोडलं तुमच्या सोबत राहणं
कारण तुम्ही फक्त तोंडावर
माझ्यासोबत असल्यासारखं दाखवत होते आणि
माझ्या पाठीमागं माझ्याच
विरोधात काड्या करीत होते..! 💯😏
घरातलेच भाडखाव नात्यांत विष कालवत राहिले, जीव लावणाऱ्या चेहऱ्यामागे काही लबाड लांडगे पाहिले.
संस्काराने गुंडाळलेलो मी मानसन्मान करत राहिलो, ते आमच्या इज्जतीचा भर चौकात तमाशा करत राहिले.
आयत्या पिठावर रेघा ओढणारेच आता
यशावर ज्ञान देऊ लागलेत…
गाडी पंक्चर झाली म्हणून
पायी चालण्यालाच “संघर्ष” म्हणू लागलेत..! 😏🔥
तू जर एक रुपया कमवू शकतोस, तर करोड रुपये देखील कमवू शकतोस, आता निर्णय तुझा आहे.
दरवेळेस शांत राहून आणि सहन करून नाही चालत, कधीकधी आपला हिसका हा लोकांना दाखवायलाच लागतो नाही तर काही म्हंटलच नाही की लोकं आपल्याला हलकं आणि कमजोर समजतात…..
इतिहास नेहमी संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो, चाटुकारांचा नाही!
आपला फक्त स्वभाव भोळा आहे
भाऊ डोक खूप शातिर आहे आपलं कोण आपला आहे आणि कोण आपलेपणा च्या नावाखाली शाळा करतंय हे सगळं कळतं आपल्याला…!
तुमच्या आयुष्यात खुश राहा, मी वाईट असेन तर माझ्यापासून लांब राहा!!
आम्हालाही हृदयांशी खेळता येतं, पण ज्यात खेळणं तुटतं तो खेळ आम्हाला मान्य नाही…!!
आम्ही संकटांनी वेढलेले आहोत, पण सावरून उठू; मात्र नजरेमध्ये पडलेले कुठे जातील?
तुम्ही विचार करत असाल की तुम्ही एकटे आहात, पण नीट विचार केलात तर हेच सत्य आहे समजेल.
निःसंशय माझ्या स्वभावावर बोट ठेवा, पण ती बोट निर्दोष असायला हवी..!
मोठं व्हा, पण त्याच्या समोर नाही ज्याने तुम्हाला मोठं केलं!
माणुसकी हृदयात असते, प्रतिष्ठेत नाही; देव फक्त कर्म पाहतो, प्रॉपर्टी नाही.
आयुष्यात इतकं उजळ व्हायचे आहे, की जळणाऱ्यांना राख करून टाकायचं आहे!!
मी माझ्या झोपडीत बादशहा आहे, कोणाच्या महालात गुलाम नाही.
लायकीची गोष्ट करू नकोस मित्रा, तुझ्या खिशापेक्षा मोठं माझं मन आहे!
छातीवर चढून बोलणं ही माझी सवय आहे, आम्ही कोणत्याही राजकारणाचा दलाल नाही!
नशा फक्त नोटांचाच करतो, मुलींची नाही.
इतरांना महाग कराल, तर स्वतः स्वस्त होऊन जाल!
लोकांकडून ऐकाल, तर मी वाईटच वाटेन; पण स्वतः
भेटायला आलात, तर वचन देतो, हसत निघाल.
लोक म्हणतात
पैसा नाही पण इज्जत खुप कमावली
एकदा मोकळ्या खिशानं बाजारात फिरून तर बघा तेव्हा कळेल इज्जतीला भाव तेव्हाच असतो जेव्हा खिशात नोटांचा आवाज असतो..!!
Love attitude status Marathi
मर्दा, ऑफिस मध्ये पोरीच्या प्रेमात पडायचं नाही……
ज्याच्यावर आपलं घर चालतं, तिथं असली लफडी करायची नाही.
गप्प काम करायचं आणि निघायचं !
😏 नाती कशी निभवायची
याचं ज्ञान आम्हाला देऊ नका,
कारण जे मनात आमच्यासाठी
विष भरून बसले आहेत,
त्यांच्याशीही आम्ही
हसतच बोलतो.
माझ्याविरुद्धच्या गोष्टी मी शांतपणे ऐकतो… उत्तर देण्याचा हक्क मी वेळेला दिला आहे.
शांत राहून दिलेलं उत्तर समोरच्याला विचारात पाडतं!
गळ्यात मिठी घालून खंजीर खुपसू नकोस; धाडस असेल तर नियमाने शत्रुत्व निभाव!
Support शोधून ठेव, कारण तुला त्यांची सवय आहे; आम्ही तर एकटेच सगळ्यांना भारी आहोत!
गद्दारांचा विषय निघाला की आम्हाला आमचे काही जुने मित्र आठवतात.
रुबाब शायरी मराठी
आम्ही कुणाचे गुलाम होऊन जगत नाही मित्रा; राहायचं असेल तर सोबत रहा, अन्यथा स्वतःच्या जागेवर रहा!
ज्याच्यामुळे माझ्या भावाला वाकायला लागलं, ती हस्ती उध्वस्त करायला वेळ लागणार नाही!
राजकारण आणि त्रास जरा मापातच असावा… 🤫
कारण ज्या दिवशी समोरच्याचा संयम सुटेल, 🔥
त्या दिवशी तुमचं अख्खं साम्राज्य धुळीला मिळेल! 🌪️👑
वाईट करूनही काही वाईट वाटलं नाही, तर समजून घ्या की वाईटपणा त्याच्या स्वभावात आला आहे!
सगळं विकाऊ आहे, फक्त किंमत माहीत असायला हवी!
थोडी नजर स्वतःच्या चुका पाहण्यात घाला… भावा, नेहमीच माफीच्या मूडमध्ये नसतो मी!
Attitude Shayari Marathi Boy
आहे जे बोलायचं ते बोलावं तोंडावर खोटं बोलुन आपुलकीच आमिष नको, असेल नात्यात जिव्हाळा तर सांगाव हक्काने उगाच बोलण्यात गोडवा न मनात विष नको !
घेरलं आहे तर मारूनच टाका; काय माहित उद्याची बाजी माझ्या हातात असेल!
लोक त्रुटी शोधायला लागले की, ते तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टी विसरून जातात.
जखम बरी झाली तरी प्रसंग विसरता येत नाही, माझ्या भावा.
आग जरी परक्यांनी लावली तरी हात शेकणारे काही आपलेच होते!
आता ती वेळ आली आहे, ज्याची मी वाट पाहत होतो; विश्वास ठेवा, प्रत्येकाचं हिशोब करून मगच निवांत होईल!
attitude shayari in marathi
तुम्ही फक्त आमचं सरळ रूप पाहिलं आहे, आमचा इतिहास खूप खोल आहे!
आमच्याबद्दल जास्त विचार करू नका; आम्ही शांत राहूनही अनेक कांड केले आहेत!
जर रागात असताना मी हसत-हसत निघून गेलो, तर समजून घ्या की संकट तुमच्यावरून टळलं आहे!
शांत बसलोय याचा अर्थ असा नाही की मी संपलोय… थोडा वेळ द्या, एकेकाचा माज जमिनीवर नाही आणला तर नावाचा ब्रँड सांगणार नाही! 🤫🔥👑
चेहरे सगळ्यांचे लक्षात आहेत; फक्त योग्य वेळेची वाट पाहतोय!
बदला कधीच संपत नाही, योग्य वेळी मी नक्की परत येईन, पूर्ण तयारीनिशी!
अंतिम शब्द :-
तुम्हाला आजच्या पोस्टमधील दिलेले एटीट्यूड स्टेटस कॅपशन कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या मित्र-मैत्रिणीबरोबर हे स्टेटस शेअर करायला विसरू नका.