प्रेरणादायक मराठी सुविचार संग्रह | Marathi Suvichar Sangrah.

मराठी सुविचार जे तुम्हाला आत्मविश्वासाने संघर्ष करण्याचे देतील प्रेरणा..!

Marathi suvichar with images

मित्रांनो आजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जगत असताना नेहमी प्रेरणेची गरज पडत असते, कारण की आपण सर्वजण एका वेळेला येऊन कुठे ना कुठे हार मानतो किंवा आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नाही. मराठी सुविचार तुम्हाला तुमच्या ध्येयाला मिळवण्यासाठी खूप जास्त प्रेरणा देऊ शकतात तसेच ऊर्जेने भरून टाकू शकतात.

लहानपणी शाळेत असताना आपण पाहायचो की शिक्षण दररोज फळ्यावर “आजचा सुविचार” लिहीत असे. शिक्षकाचा उद्देश हाच होता की, आपल्या विद्यार्थ्यांनी त्या सुविचारामधून बोध घ्यावा. आजच्या पोस्टमधील प्रेरणादायी सुविचार तुम्ही तुमच्या प्रियजनांना share करा , जेणेकरून त्यांना त्यांचा संघर्ष करत असताना प्रेरणा मिळेल.

Latest Marathi Suvichar

Latest Marathi Suvichar

आजचा सुविचार
वादळात पत्याचे घर बांधले जात नाही, रडून बिघडलेले नशीब सुधरत नाही, जग जिंकण्याचा आत्मविश्वास ठेवा, कारण एका पराभवाने कोणी भिकारी होत नाही, आणि एका विजयाने कोणी सिकंदर होत नाही…!!

तो माणूस खूप मजबूत होतो, ज्याने स्वतःच्या हातांनी स्वतःचे अश्रू पुसले असतात.

तयारी जोरात सुरू कर भावा…
येणारं वर्ष फक्त कॅलेंडर बदलणार नाही,
तर आपल्या कष्टांचं आणि मिळालेल्या टोमण्यांचं
ठोस उत्तर देयच आहे.
2026 पासून नावाने नाही,
ओळख युवा उद्योजक म्हणून झाली पाहिजे. 🌱🔥

साम्राज्य उभारण्यासाठी मनाने नाही तर बुद्धीने चालावे लागते.

ज्या वाटा खूप सुंदर दिसतात, त्या नेहमीच विनाशाकडे घेऊन जातात!

जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो ना तेव्हा तुमच्याकडे इज्जत सुध्दा येते इज्जत तुमच्याकडे तुम्हाला बघून नाही तर पैश्याला बघून येते त्यामुळे माणसं जरा कमी कमवा पैसा जरा जास्त कमवा…

त्यासाठी मेहनत करा मित्रांनो, ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला म्हणाल… कठीण होतं पण मी करून दाखवलं!

​​”जगाच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करा, कारण तुमच्या कष्टाचं फळ मिळालं की हीच दुनिया टाळ्या वाजवायला सर्वात पुढे असेल.”

marathi suvichar short

marathi suvichar short

पराभवाने कथा संपत नाही, तर नव्या अध्यायाची सुरुवात होते.

प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार कराल, तर स्वतःलाच जखमी कराल.

संधी प्रत्येक सकाळी तुमचं दार ठोठावते, पण तुम्ही झोपलेले असाल तर ती निघून जाईल.

​”जेव्हा सत्याची साथ आपल्याकडे असते, तेव्हा जगाच्या विरोधाची भीती बाळगण्याचे कारण नसते.”

सुरुवात कुठूनही होऊ शकते, फक्त आपली उंच भरारी घेण्याची इच्छा हवी.🦅

गरीब घरात जन्म होणे तुमची चूक नाही, पण गरीबच मरणे ही तुमची चूक आहे.

देवाकडे प्रत्येक गोष्टीसाठी Plan असतो फक्त तुमच्याकडे यश मिळेपर्यंत वाट बघण्याची धमक असावी लागते.💪

प्रत्येक मोठ्याचा सल्ला ऐकायलाच हवा असं नाही,
कारण मूर्खही वयाने मोठे होतात.
वयाचा मान ठेवा, पण स्पष्ट विचारांचीच कदर करा.

marathi suvichar images

marathi suvichar images

जर तुम्हाला दुसऱ्यांमध्ये कमी दिसत असेल, तर त्यांच्याशी बोला. पण जर प्रत्येकामध्ये कमी दिसत असेल, तर स्वतःशी बोला.

​​​​​​​”फांदीवरचा पक्षी कधीच कोसळत नाही, कारण त्याला आधारापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर जास्त विश्वास असतो. तुमचा आत्मविश्वास हाच तुमचा सर्वात मोठा आधार आहे.”

पैसा घर 🏤 आणि काम यात व्यस्त रहा वेळेला कोण येत नाही सगळं काही पैसाच बोलतो..

“माझ्याने नाही होणार” असं विचारू नका, तर “माझ्याशिवाय हे कोण करू शकणार?” असं विचार करा.

आजच्या काळात लोकांना वाईट गोष्टींचा सहज नाद लागतोय, अशा काळात जर तुला करिअर, सेल्फ improvement आणि जिमचा नाद असेल ना…..
तर तू ऑलरेडी जिंकलाय भावा !

प्रत्येक छोटासा बदल यशाच्या मोठ्या प्रवासाचा भाग असतो.

जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, तेव्हा तुमचा सावळा रंगही लोकांना आवडेल.

शांततेने लक्ष्याचा पाठलाग करा, कारण शिकार नेहमी शांततेतच होते, गडगडाटात नाही.

🌿 सर्वांना सुख देणं आपल्या हातात नसेलही,
पण कुणाला दुःख न देणं मात्र नक्कीच आपल्या हातात असतं।
म्हणून नेहमी दुसऱ्यांचा आधार व्हा,
कदाचित हाच पुण्यकर्म कधीतरी आयुष्यात तुमचाच आधार बनेल…

मराठी सुविचार संग्रह

marathi suvichar sangrah

योग्यतेवर माझ्या लय भाषण ठोकली यांनी या कर्तुत्वावर एकही कलंक लागू देणार नाही.
अंगाची सालटी निघाली तरी चालतील काही केल्या आता माघार मी घेणार नाही.

अशक्य हा शब्द फक्त भ्याडच वापरतात; शूर आणि बुद्धिमान लोक स्वतःचा मार्ग बनवतात.

थकला असाल तर थोडा आराम करा, पण कधीही हार मानू नका.

“महत्त्व त्यालाच द्या, जो तुमची किंमत ओळखतो.. कारण मोफत मिळणाऱ्या गोष्टींची जग नेहमीच अवहेलना करते.” 💎🔥

मुलांनो आधी करिअर करा कारण… प्रेम करायला रिकामटेकडा चालतो पण जेव्हा आयुष्याच्या प्रश्न येतो तेव्हा successful झालेला मुलगाच निवडला जातो.

तुमच्या व्यक्तिमत्त्वात इतकं सामर्थ्य असावं की तुमच्या उत्तरानंतर कोणीही प्रश्न विचारू शकणार नाही.

एक मिनिटाचं यशही बर्‍याच वर्षांच्या अपयशाची किंमत भरून काढतं.

जग तुम्हाला कसं पाहतं हे महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसं पाहता हे महत्त्वाचं आहे.

मराठी सुविचार मोटिवेशनल / marathi suvichar motivational.

marathi suvichar motivational

तुला क्लिअर सांगतो मर्दा… आपले आई वडील अमरत्व घेऊन आलेले नसतात. ते जिवंत आहेत तोवरच त्यांना तुझ्या यशाची फळे चाखुदे.
ते पण लवकरात लवकर.
अर्जंट !!🙏

​​​​​​”समाजाची पर्वा त्या दिवशी करा, ज्या दिवशी हा समाज तुमच्या घराचा खर्च उचलेल आणि तुमच्या सुख-दुखात खंबीरपणे उभा राहील!”

खूप लोकांना वाटते की I LOVE YOU हा जगातील सुंदर massage आहे पण खरं तर … “SALARY is credited to your account xxXXXXX
या massage सारख सुख कोणतच नाही.

​”तुमच्या संघर्षाचा गाजावाजा करू नका, तो शांततेतच घडू द्या… कारण शुभेच्छा देणाऱ्या हातांपेक्षा, पाय खेचणारे डोळे जास्त असतात.”

​”परिस्थिती मनाविरुद्ध असेल तर शांत राहा… कारण येणारी वादळं तुम्हाला संपवायला नाही, तर स्वतःची ओळख करून द्यायला येतात.”

जिमला जा, चांगला व्यायाम करा. वादविवाद टाळा.
स्वच्छ कपडे घाला, चांगला परफ्यूम लावा. नवीन स्किल शिका, पैसे कमवा.
तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये सुधारणा करा.
कमी बोला आणि जास्त एक्शन करा. प्रार्थना करा, मोठ्यांचा आदर करा..
स्वतःबद्दल चांगला विचार करा.

स्वतःला कल्पनेमध्ये टॉर्चर करणे बंद कर यार,
तुला माहितीये रियालिटीमध्ये तुझ्या आयुष्यात
जेवढे प्रॉब्लेम नाहीत तेवढे तू करून ठेवले आहे,
तुझ्या overthinking मुळे तुला वाटतंय
तुझं सगळं बरबाद होत चाललंय पण तेवढे
नाहीत तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम, ती नाहीये रिऍलिटी
खरं सांगतो ते वाटतंय आणि तुलाच वाटतंय
तू एकटाच आहे का काही प्रॉब्लेममध्ये पडलेला
नाही ना !
खूप लोक प्रॉब्लेममध्ये पडले आणि बाहेर आले
तू पण यातून बाहेर येशील…..
तुझे पण दिवस बदलणार ,तुझे पण चांगले होणार
पण पहिले स्वतःला सांग ,भीती वाटतीय
स्वतःला सांग ” माझं चांगलंच होणार”

आनंदाचे खरे मालक बना, कारण इथे आनंद देणारे कमी, पण दुःख देणारे जास्त भेटतात.

गरिबीच्या झळा झेलल्यात या तरुण रक्ताने परिस्थिती पलटवया अजून काही डाव राहिलेत.
उगीच स्वप्नांच आभाळ कोणी घेऊन फिरत नसत रे गळक्या पत्र्यातून आम्ही कित्येक पावसाळे पाहिलेत.

“वेळ तुमचा गुरू आहे”, जो शिकवतो की, यश न मिळाल्यास तुमचं कोणीच आपलं राहणार नाही.

मार्ग उघडतील, फक्त अडथळ्यांना भिडा आणि जिद्दीने उभे रहा.🤙

नेहमी स्वतःकडे पहिले पाहा, कारण चुकी दुसऱ्यात शोधणे योग्य नाही.

तरुणपणाची किंमत, आवडत्या गोष्टींवर त्यागाची मागणी करते, तीच पुढे योग्य वाट दाखवते.

​”संयम राखा… सूडाची भावना नसावी. वेळ आली की प्रत्येकाला स्वतःच्या कर्माचे फळ मिळतेच. लक्षात ठेवा, वेळ कोणालाच विसरत नाही, ती प्रत्येकाचा हिशोब अचूक मांडते.”

मराठी सुविचार स्टेटस / marathi suvichar status.

marathi suvichar status

इतक्यात हरुन कस चालेल भावा आजून तर अख्खी भावकी जळवायची आहे .!!

रोज घुसमटत श्वास घेणं हे जगणं नव्हे रे, कधीतरी एखाद्या नव्या वादळाला मिठी देऊन बग.
किती दिवस त्या डबक्यात पोहत बसणार गड्या, एखादा निर्णय तुझ्या औकाती बाहेरचा ही घेऊन बग.

वेळ वाईट असेल तर मेहनत करा, आणि वेळ चांगला असेल तर इतरांची मदत करा.

नशीब बदलेल, चित्रही बदलेल, फक्त हिम्मत सोडू नकोस, प्रवासाच्या मार्गावर मेहनत करा; एक दिवस आयुष्यही बदलेल.

​”सामर्थ्य आणि सुख जितके गुप्त ठेवावे, तितके ते जास्त काळ टिकते.
कारण ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ असते; ज्या दिवशी ती जगासमोर उघडली जाते, त्या दिवशी तिचे मूल्य आणि कुतूहल दोन्ही संपून जाते.”

वेळेला समजणे ही शहाणपणाची खूण आहे, पण वेळेत समजणं ही जबाबदारी आहे.

ध्येय मिळेलच, भटकंतीतून का होईना, भरकटले तेच आहेत जे घरातून निघालेच नाहीत.

भूतकाळाकडे बघून पश्चात्ताप करण्यापेक्षा, भविष्याकडे पाहून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणं अधिक चांगलं आहे.

सगळं काही जगाला सांगणं गरजेचं नसतं…
फिरा, वाचा, मेहनत करा आणि स्वप्नं पूर्ण करा.
दुसऱ्यांसाठी नाही, तर स्वतःसाठी. 🌿

!! कोणाला अंदाज लावता नाही आला पाहिजे असं काही तरी करायचं आहे भावा आपल्याला..!!

आईला काळजी असते की मुलगा आज उपाशी राहू नये,
आणि वडिलांना चिंता असते की मुलगा उद्या कधी उपाशी राहू नये.
या दोघांचं प्रेम, त्याग आणि विचारच इतके महान असतात,
की जगात त्यांच्या नात्याचं स्थान देवापेक्षाही उंच मानलं जातं.

​”मानवी मनाची इच्छाशक्ती हीच त्याची सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. जो प्रतिकूल परिस्थितीतही चित्त शांत राखतो, तोच खरा यशस्वी व्यक्ती.”

​​​​​​​​​​​”दुसऱ्याचं नुकसान करून स्वतःचं भलं शोधण्यापेक्षा, आपलं कोणावाचून अडणार नाही एवढं स्वतःला समर्थ बनवणं म्हणजे खरं आयुष्य!” ✨🙏

marathi suvichar for students. 

Marathi Suvichar images

मिठासारखा स्वभाव ठेवा; ना कुणी जास्त वापरू शकेल आणि ना तुमच्याशिवाय राहू शकेल.

सगळं काही जगाला सांगणं गरजेचं नसतं.
फिरा, वाचा, मेहनत करा आणि स्वप्नं पूर्ण करा…
इतरांसाठी नाही, तर स्वतःसाठी.

मन ही एक पवित्र जागा आहे,
जिथे तुमची परवानगी नसताना
कोणतीही नकारात्मक गोष्ट प्रवेश करू शकत नाही.
म्हणून मन स्वच्छ, शांत आणि जागरूक ठेवा,
कारण तिथेच तुमचं खरं जग घडत असतं.

आयुष्य तुझं, स्वप्नं तुझी, ध्येयं तुझी, हार-जीत आणि मेहनत सुद्धा तुझी आहे. मग या फालतू लोकांच्या बोलण्यावरून हार मानणे काय आहे?

जे मिळालंय त्याचा आभारी रहा, आणि जे नाही मिळालं त्याचा संयम ठेवा.😊

काही काळ शांत राहा, कारण आवाज उठवण्याची वेळ नक्की येईल.🔥

रडून काहीच बदलत नाही, थांबून यश गवसत नाही..! उठ, उभा राहा, लढा दे, कारण हरलेला पुन्हा हरत नाही..!

नशिब मेहनतीने बदलतं, फक्त विचार करण्याने नाही. म्हणून उठ, तुझ्या ध्येयावर काम कर, कारण वेळ भराभर जातोय.

आपल्या आयुष्याची तुलना कोणाशीही करू नये।
🌞 सूर्य आणि 🌙 चंद्र यांची तुलना नसतेच,
कारण ज्याचा जो वेळ येतो, तो तेव्हा नक्कीच उजळतो.

स्टेटस आयुष्याचा असो किंवा मोबाईलचा,
असा ठेवा की लोकांना तो कॉपी करावासा वाटावा.

​​”लोक काय म्हणतील म्हणून स्वतःला बदलू नका,
आपलं स्वप्न काय आहे ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला बदला..!!”

मराठी सुविचार नवीन

marathi suvichar motivational

होऊदे वर्तमानाची राखरांगोळी गड्या, पण एकदा स्वतःच्या मनाविरुद्ध वागून बग.
भविष्याच गणित विजयाने सोडवायचं असेल तर, स्वतःच्या स्वप्नासाठी एखादी रात्र जागून बग.

ताकदीचे दर्शन रोज करायचे नसते, गरज पडल्यावरच विजा कडकडल्या पाहिजेत, ढग साठू देत आधी नभांगणात,
आभाळ गाठायचं असेल तर वादळं उसळली पाहिजेत !

जेव्हा एकटं चालायला लागलो, तेव्हा समजलं की मीही कुणापेक्षा कमी नाही.

“हरलात का? रडाच… पण शांतपणे, एकट्याने. जेव्हा वाटतं सगळं जग तुमच्याविरुद्ध उभं आहे, तेव्हा अश्रूंना थांबवू नका. पण जेव्हा जिंकाल ना… तेव्हा लहान मुलासारखं रडून टाका! अभिमानाने सांगा — ‘हो, पुरुषही रडतात… आणि रडताना ते विराटसारखे सुंदर दिसतात!’”

ध्येय मिळवण्याची आशा कधीही सोडू नका, कारण सूर्य मावळल्यावरच पुन्हा सकाळ होते.

वेळ माणसाला यशस्वी करत नाही, पण वेळेचा योग्य वापरच माणसाला यशस्वी करतो.

ज्याचा गुरु वेळ आहे त्याने प्रत्येक धडा शिकला आहे, त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही.

आता खूप पळालास जगाच्या मागे-मागे, आता स्वतःला पुढे ठेवायची वेळ आली आहे. जगाशी मैत्री खूप झाली, आता स्वतःशी स्वतःची मैत्री कर.

काहीतरी करून दाखवण्यासाठी हवे असते मन, हवे असते दृढ निश्चयाचे भांडवल; साधने सर्व आपोआपच मिळतील.

जीवनाची लढाई स्वतःच लढावी लागते; लोक सोबत कमी देतात आणि सल्ले जास्त देतात.

निराश होऊ नकोस, तुझं अस्तित्व छोटं नाही; तू ते करू शकतो जे कुणीही कल्पनेतही आणलं नाही.

हे तुझेच जीवन आहे, जे तुलाच बदलायचे आहे; कालपेक्षा जास्त, आज तुला जिंकायचं आहे.

​​​​​”सुखाचं कुलूप आणि समाधानाची किल्ली, नेहमी स्वतःकडेच ठेवा… लोक फक्त गोंधळ घालण्यासाठी येतात, सावरण्यासाठी नाही.” 🔒🔐

जिंकणं नक्की असेल तर भ्याड सुद्धा लढतात; शूर तोच असतो जो हार नक्की असूनही मैदान सोडत नाही.

रूप आणि पैशावर कधीही गर्व करू नका, कारण गरीबी आणि आजारपण कधीही विचारून येत नाहीत.

जीवन खूप सोपं होतं, जेव्हा तुम्हाला याचा फरक पडत नाही की लोक काय म्हणतील.

नेहमी लक्षात ठेवा, लोणी लावणाऱ्यांच्या हातात कायमच चाकू असतो.

“लोक काय म्हणतील” यावर विश्वास ठेवत नाही, कारण आयुष्य माझं आहे, लोकांचं नाही.

सगळ्यांचा सन्मान करा, पण तितकीच इज्जत द्या, जितकी तुम्हाला मिळते.

वेळ तुमचाच आहे. हवे तर सोनं बनवा, नसेल तर झोपण्यात घालवा.

प्रत्येक वेदना एक धडा देते आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो.

स्वाभिमान कधीही निष्ठेशी तडजोड करत नाही; वेळ वाईट आला तर सहन करू, पण कधीच झुकणार नाही.

कोणाला समजवण्यात वेळ वाया घालवू नका, कारण समजावणं फुकट जातं; काही लोक फक्त स्वतःच्या आवडीनुसार ऐकतात.

यश हे जीवनात आवश्यक आहे… कारण जर तुम्ही यशस्वी नसाल, तर तुमचं स्वतःचंही कोणी नसतं!

“स्लो सक्सेस कॅरेक्टर घडवतं, फास्ट सक्सेस अहंकार वाढवतं.”
रतन टाटा

संघर्षाशिवाय जीवन अपूर्ण आहे.

फक्त उशिरा सुरुवात केली म्हणून
तुम्ही हराल असे नाही..!.

तक्रार दुसऱ्यांकडून नाही, स्वतःकडून आहे, कारण मी तिथे पोहोचलेली नाही जिथे मला असायला हवं होतं!

केवळ हालचाली दिसत नाहीत याचा अर्थ असा नाही की काही होत नाही.

कशासाठी रडणं-धडपडणं मित्रांनो? वरच्याने दिलेली आयुष्य, तो कधी परत घेईल काही माहित नाही, म्हणून जगत असताना नेहमी हसत राहा.

कोण काय करतंय, कसं करतंय, का करतंय, या सगळ्यांपासून जितकं दूर राहाल, तितकं आनंदात राहाल.

मेहनत करणं गरजेचं असतं मित्रांनो, हातात घड्याळ बांधल्यानं वेळ येत नाही.

वेळ कधीच थांबत नाही.
आजचा काळ कठीण असेल, तर उद्या नक्कीच उजाडणार आहे.
आपल्या हातात फक्त प्रामाणिकपणे कर्म करत राहणं आहे,
फळाची चिंता न करता पुढे चालत राहा,
कारण बदल हा वेळेचा स्वभावच असतो.

संगतीचा परिणाम टळत नाही! ज्या लोकांमध्ये आणि वातावरणात तुम्ही राहता, ते तुमच्यावर परिणाम करतं. म्हणूनच मित्र आणि संगती काळजीपूर्वक निवडा.

मराठी सुविचार मोठे

मराठी सुविचार

ज्यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं असतं,
त्यांना रुसायला किंवा खचायला वेळ नसतो;
कारण त्यांना थांबून चालत नाही,
ते चालत राहतात, स्वतःसाठी नाही, तर आपल्या काळजाच्या जवळच्या लोकांसाठी.

लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी टिंगल करतील, आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातील! लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. तुम्हाला पाहिजे ते करा, जे तुम्हाला आनंद देतं. कारण आयुष्य तुमचं आहे, लोकांचं नाही!

शांतीत क्रांती करायची असेल ना… तर फक्त 6 महिने स्वतःवर काम कर !
ना कोणाला सांग, ना स्टोरी टाक, ना प्रूव्ह करायला धाव!
फक्त डोकं खाली ठेवून… Discipline, Dedication आणि Daily Grind वर Focus कर!”
लोक हसतील, बोलतील, चेष्टा करतील… पण 6 महिन्यांनी तेच लोक म्हणतील -आधी कसा फाटलेला होता राव… आता बघ तो काय बनलाय !’
No Flex… फक्त Focus! No Timepass… फक्त Transformation! No Excuses… फक्त Execution!
शांतीत क्रांती तीच खरी… Progress काम एकदम शांततेत करायचं की Sucess च Direct DJ वाजला पाहिजे.
6 महिने दे स्वतःला… बाकी आयुष्य तुझ्या नावाचं होईल!”

​​​​​​”प्रयत्नांची उंची इतकी वाढवा की, नशिबाने सुद्धा तुम्हाला हरवण्याऐवजी तुमची साथ देणं पसंत केलं पाहिजे.” 🏔️🏃‍♂️

कमजोरी कुणाचीच नसते… परिस्थितीच लोकांना कमकुवत बनवते, आणि नालायक लोक याचा गैरफायदा घेतात, स्वत:ला सिंह समजतात.

जीवनातील प्रत्येक नवीन दिवस आपल्याला चांगलं होण्यासाठी नवा संधी देतो. त्या संधीचं चीज करा, ती वाया जाऊ देऊ नका.

मनातील गुपितं प्रत्येकाला सांगू नका! कधी मित्र शत्रू होईल सांगता येत नाही. मनातील प्रत्येक गोष्ट सावधगिरीनेच व्यक्त करा.

स्वतःविरोधातील गोष्टी शांतपणे ऐका… वेळच सर्वात चांगले उत्तर देते, यावर विश्वास ठेवा!

इतिहास साक्षी आहे…
एखादा माणूस जिद्दीला पेटला,
तर तो नजरेत न मावेल
असं मोठं साम्राज्य उभं करू शकतो. 🌱🔥

स्वतःच्या चुका मान्य करणारा व्यक्ती… स्वतःशी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला कोणीही हरवू शकत नाही.

Marathi suvichar for school

marathi suvichar for students

सर्वप्रथम स्वतःला आनंदी ठेवा! जगाचं विसरा, कारण दररोज तुम्हाला आरशात दिसणाऱ्या व्यक्तीचं सुख सर्वात महत्त्वाचं आहे.

ज्यांनी तुम्हाला विसरलंय… त्यांना फक्त त्यांच्या गरजेचा दिवस येऊ द्या, ते तुम्हाला नक्कीच आठवतील.

पैशापेक्षाही मौल्यवान आहे ती मनाची शांती… 🕊️
वेळेवर भरलेली बिलं आणि सुरक्षित घर, 🏠
ज्यापाशी हे सर्व आहे, तोच खरा श्रीमंत! 💰🙌
#आयुष्य #सत्यविचार

ज्यांच्याकडे एकटं चालण्याचा धीर असतो… एक दिवस संपूर्ण गर्दी त्यांच्या मागे चालते.

नुसते कारणे देणारे नेहमी हरतात… आणि विजेते कधीच बहाणे शोधत नाहीत.

स्वतःची तुलना इतरांशी करू नका… प्रत्येक फळाचं चव वेगळी असते.

मराठी सुविचार अर्थासहित / marathi suvichar with meaning.

Marathi suvichar

​​​​”आयुष्य त्याचेच सुंदर आहे, जो स्वतःच्या कामात दंग आहे… आणि त्रास त्यालाच होतो, जो इतरांच्या सुखावर जळतो..!!” 😎🔥

स्वप्न मोठी बघा… चंद्राला गवसणी नाही घातली तरी ‘आकाश’ गाठाल.

यश म्हणजे संघर्षाची कथा… ती एका अपयशी माणसाच्या जिद्दीची कहाणी आहे.

स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहाणे नाही, वेडे व्हावे लागते.

मेहनतीने मन शांत होतं… आणि सत्य बोलण्याने हृदय स्वच्छ राहतं.

संघर्षच व्यक्तीला मजबूत बनवतो… मग तो कितीही कमकुवत का असेना!

संघर्षाची क्षमता वाढवा… यश तुमचं होणारच आहे.🔥

पैसा जास्त झाला की माणूस अनेकदा स्वतःलाच विसरतो,
आणि पैसा नसला की जग त्यालाच विसरून जातं.
म्हणून संपत्तीपेक्षा माणुसकी जपणं महत्त्वाचं
तीच कायम साथ देणारी असते.

मदत करण्यासाठी फक्त पैशांची गरज नसते,
त्यासाठी माणुसकीचं, संवेदनशील मन असणं अधिक महत्त्वाचं असतं.

आई-वडिलांचा आशीर्वाद हीच जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे,
त्यांच्या शुभेच्छांमध्ये अशी ताकद असते
की ती प्रत्येक अडचण सोपी करून टाकते.

जगात सर्वात धोकादायक लोक ते नसतात जे उघडपणे वाईट असतात,
तर खरे धोकादायक ते असतात जे फक्त चांगले दिसण्याचा आणि गोड बोलण्याचा दिखावा करतात.

जीवन जगण्याचे अनेक मार्ग असतात,
पण सर्वोत्तम मार्ग तोच
ज्यात स्वतःला समाधान मिळतं,
आणि आपल्या वागण्यामुळे कोणालाही दुखावलं जात नाही.
खरं जगणं म्हणजे स्वतः आनंदी राहणं आणि इतरांनाही आनंद देणं.

बदल स्वीकारायला शिका… कारण जुनं सुटल्याशिवाय, नवीन आणि सर्वोत्तम गोष्टींची सुरुवात होत नसते!”

​​”स्वत:ची किंमत करा. खंबीर मन, आत्मविश्वास आणि मनाची शांतता कोणत्याही परिस्थितीला बदलण्याचे सामर्थ्य ठेवतात.”

अधिक वाचा :- 

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

थोडक्यात

आजचा पोस्टमधील मराठी सुविचार तुम्हाला आवडले असतोल आणि तुम्हाला त्यातून खूप काही शिकायला मिळाले असेल अशी अपेक्षा करतो.

Leave a Comment