Essay on Online Education in Marathi | ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व निबंध मराठी.

Essay on Online Education in Marathi | ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी.

Essay on Online Education in Marathi

विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी ऑनलाइन शिक्षणाच्या महत्त्वावर एक सुंदर निबंध घेऊन आलो आहोत. हा निबंध वाचल्यानंतर तुम्ही केवळ ऑनलाइन शिक्षणावर एक उत्कृष्ट निबंध लिहू शकाल आणि विषयाबद्दल तुमचं ज्ञानही वाढेल.

आजच्या पोस्टचा विषय आहे ऑनलाइन शिक्षणाचे फायदे आणि तोटे. या निबंधात आपण ऑनलाइन शिक्षणाची गरज, त्याचे मुख्य फायदे, अडचणी आणि शेवटी त्याचा निष्कर्ष अशा सर्व गोष्टी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

ऑनलाइन शिक्षणाचे फायदे आणि तोटे हा निबंध अधिक प्रभावी व्हावा म्हणून आपण त्यात सुंदर स्लोगन, स्पष्ट हेडिंग्स आणि सोपी उदाहरणे वापरणार आहोत. सर्वप्रथम आपण प्रस्तावना, त्यानंतर ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय, मग ऑनलाइन शिक्षणाचे फायदे, तोटे, आणि शेवटी एक अर्थपूर्ण निष्कर्ष लिहून निबंध पूर्ण करणार आहोत.

ऑनलाइन शिक्षण फायदे आणि तोटे निबंध मराठी ( सोप्या भाषेत )

“ऑनलाइन शिक्षणाने उघडला नवा युगाचा दरवाजा,
ज्यातून विद्यार्थी आपल्या स्वप्नांना देतात नवे पंख आणि नवी दिशा.”

प्रस्तावना

ऑनलाइन शिक्षण हे आजच्या नव्या युगातील एक मोठं बदललेलं रूप आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थी आपल्या घरातूनच शिकू शकतात आणि आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतात. इंटरनेटच्या मदतीने मिळणारं हे शिक्षण आधुनिक शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण आणि पुढारलेलं पाऊल मानलं जातं.

अनेक उच्च शिक्षण संस्थांमध्येही ऑनलाइन शिक्षणाला मोठं स्थान दिलं जात आहे. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये, म्हणून ऑनलाइन क्लासेसने खूप मोठी मदत केली. त्या काळात ऑनलाईन शिक्षण पद्धत विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुरू ठेवण्याचा सर्वात सुरक्षित व सोपा मार्ग ठरला.

ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय?

ऑनलाइन शिक्षण म्हणजे इंटरनेटच्या मदतीने शिकण्याची पद्धत आहे. शिक्षण प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आधीच्या काळाच्या तुलनेत आज शिक्षणाचा व्याप खूप मोठा झाला आहे, कारण शिकवण्याच्या पद्धतींमध्ये खूप बदल झाले आहे.

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी आपल्या घरातून किंवा जिथे त्यांना सोयीस्कर वाटेल तिथून शिकू शकतात. इंटरनेटवरून त्यांना लागणारी अभ्यास सामग्रीही अगदी सहज मिळते. या पद्धतीत आपण जगातील कोणत्याही शिक्षकाकडून शिकू शकतो. त्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ऑनलाइन शिक्षण एक चांगला पर्याय ठरतो.

“ऑनलाइन शिक्षण बनलं एक वरदान, ज्यामुळे शिक्षणाला मिळाली नवी दिशा आणि नवं प्राण.”

या ओळीचा अर्थ असा ऑनलाइन शिक्षण आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी एक वरदान ठरलं आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात नवीन क्रांती आली आणि शिकण्याला एक नवा उर्जा-प्रवाह मिळाला.

ऑनलाइन शिक्षणाचे फायदे

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना अनेक सोयी मिळतात, त्यामुळे ही पद्धत आजच्या काळात खूप लोकप्रिय झाली आहे. त्यातील काही महत्त्वाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

1) शिक्षकांशी सतत संपर्क ठेवता येतो.

ऑनलाइन शिक्षणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकांशी कुठूनही संपर्क करता येतो.
व्हिडिओ कॉल, चॅट किंवा ऑडिओ कॉलद्वारे विद्यार्थी आपल्या शिक्षकांशी सहज बोलू शकतात आणि लगेच काहीही शंका विचारू शकतात.

2) वेळेची मोठी लवचिकता मिळते.

ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार शिकण्याची संधी देते. ज्यावेळी वेळ मिळेल, त्यावेळी ते लेक्चर पाहू शकतो, नोट्स डाउनलोड करू शकतो किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ बघू शकतो. यामुळे अभ्यास अधिक सोपा आणि लवचिक होतो.

3) शिकण्याचा प्रभावी आणि आधुनिक मार्ग.

ऑनलाइन माध्यमात व्हिडिओ, पीडीएफ, ई-बुक्स, पॉडकास्ट असे अनेक साधनं उपलब्ध असतात. ही साधनं पारंपरिक पाठ्यपुस्तकांपेक्षा अधिक समजायला सोपी असतात आणि अभ्यास अधिक आकर्षक बनवतात.

4) उच्च शिक्षण कुठूनही घेता येतं.

ऑनलाइन शिक्षणामुळे आता वेळ, अंतर किंवा जागा महत्वाची राहत नाही. नोकरी करत असलेले विद्यार्थी, नवीन कौशल्य शिकू इच्छिणारे किंवा प्रशिक्षण घेणारे लोक हे सर्वजण कुठूनही सहजपणे शिकू शकतात.

5) आपत्कालीन स्थितीतही शिक्षण सुरू ठेवता येतं.

कोरोना महामारीसारख्या परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे रामबाण उपाय ठरला होता. घरबसल्या सुरक्षित राहूनही शिक्षण थांबले नाही. ऑनलाईन शिक्षणपद्धत अशा परिस्थितीत शिक्षण सुरू ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

ऑनलाइन शिक्षणाचे तोटे

ऑनलाइन शिक्षणाचे अनेक फायदे असले तरी काही महत्त्वाचे तोटेही आहेत. अभ्यास करताना विद्यार्थ्यांना काही अडचणींचा सामना काही वेळा करावा लागतो.

1) इंटरनेट आणि उपकरणांचा जास्त खर्च

ऑनलाइन शिक्षणासाठी चांगल्या स्पीडचं इंटरनेट, मोबाइल किंवा संगणक लागतो. हे सर्व मिळवण्यासाठी खर्च वाढतो आणि काही कुटुंबांसाठी हा खर्च परवडणारा नाही.

2) स्क्रीनवर जास्त वेळ लक्ष ठेवणं कठीण.

अनेक विद्यार्थ्यांना जास्ती वेळ मोबाइल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करणं कठीण जातं. ऑनलाइन क्लासदरम्यान सोशल मीडिया किंवा इतर साईट्समुळे मन लवकर विचलित होऊ शकतं.

3) शिक्षकांना समजवताना अडचण येऊ शकते.

ऑनलाइन क्लासमध्ये शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याचा लक्षपूर्वक अभ्यास तपासता येत नाही. समोरासमोर बसून शिकवल्यास विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजतो, पण ऑनलाइनमध्ये हे थोडंस अवघड होतं.

4) विद्यार्थ्यांचा स्पर्धा आणि सहभाग कमी होतो.

ऑनलाइन क्लासमध्ये विद्यार्थी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यापासून टाळतात. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि स्पर्धेची भावना कमी होऊ शकते.

5) आरोग्यावर नकारात्मक परिणाम.

लहान मुलांनी मोबाइल किंवा लॅपटॉपची स्क्रीन जास्त वेळ पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. यामुळे डोकेदुखी, डोळ्यांत जळजळ किंवा तब्येतीवर इतर परिणाम होऊ शकतात.

निष्कर्ष

ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षणाची पोहोच खूप वाढली आहे. अनेक विद्यार्थ्यांना घरबसल्या चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण मिळण्याची संधी मिळते. पण या पद्धतीसोबत काही अडचणी आणि मर्यादाही आहेत. ऑनलाइन शिक्षण प्रामुख्याने स्वतः शिस्त पाळणाऱ्या मोठ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य ठरणार आहे.

लहान मुलं आणि किशोरवयातील विद्यार्थ्यांसाठी शाळेत जाऊन प्रत्यक्ष शिकणं अधिक फायदेशीर असतं, कारण तिथे शिक्षकांचा मार्गदर्शन, वर्गातील वातावरण आणि स्पर्धा यामुळे शिकण्याची गुणवत्ता वाढते.

भविष्यात ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतींचा मिश्र वापर केल्यास शिक्षण क्षेत्राला अधिक सकारात्मक दिशा मिळेल.

2) ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व निबंध मराठी.

प्रस्तावना

कोरोना काळाने देशातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत केली. उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने अनेकांना आर्थिक अडचणी होत्या. रोजंदारी करून आपल्या मुलांना शाळेत पाठवणाऱ्या कुटुंबांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आता मुलांचं शिक्षण कसं सुरू ठेवायचं?

देशभर लॉकडाउन झाल्यामुळे शाळा-कॉलेज बंद पडली आणि सर्व काही थांबल्यासारखं वाटत होतं. अशा वेळी शिक्षण थांबू नये म्हणून भारतातील शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केलं. मोबाइल, इंटरनेट आणि ऑनलाइन क्लासेसच्या मदतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण घरबसल्या सुरू राहू शकले. ही पद्धत त्या कठीण काळात विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी मोठा आधार होती.

ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय?

परदेशात ऑनलाइन शिक्षणाची कल्पना अनेक वर्षांपासून आहे, पण भारतात या पद्धतीला खरा वेग कोरोना काळात मिळाला. शाळा आणि कॉलेज पूर्णपणे बंद झाल्यावर विद्यार्थ्यांना घरी बसून शिकता यावं म्हणून ऑनलाइन शिक्षणाची सुरुवात मोठ्या प्रमाणावर झाली.

ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थी मोबाइल, लॅपटॉप किंवा संगणक यांच्या मदतीने घरीच बसून शिकू शकतात. शिक्षकही याच साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवतात आणि त्यांच्या सर्व शंका दूर करतात.

ऑनलाइन शिक्षण पद्धतीत इंटरनेट खूप महत्त्वाचं असतं. शहरांमध्ये इंटरनेटची सुविधा चांगली असल्यामुळे ऑनलाइन शिक्षण लगेच सुरू झालं आणि बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलं. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी अडचण ठरली, कारण अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधा कमी किंवा कमजोर होती. यामुळे त्या भागातील मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळवताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला.

ऑनलाइन शिक्षण का आवश्यक आहे?

कोरोना महामारी आणि जगभर झालेल्या लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्णपणे थांबू नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला शिक्षक आणि विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या, पण हळूहळू दोघांनाही ही पद्धत समजायला लागली आणि तिची सवय झाली.

घरबसल्या शिकता येणं हा या ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा मोठा फायदा होता. यामुळे लहान मुलांना कोरोना संसर्गापासून सुरक्षित ठेवता आलं. शाळा बंद असतानाही त्यांच्या शिकण्याची प्रक्रिया थांबली नाही. लॉकडाउन संपल्यानंतरही काही काळ ऑनलाइन शिक्षण सुरूच ठेवण्यात आलं, जेणेकरून मुलांचा आरोग्याचा धोका कमी राहिला.

11 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी लसी उपलब्ध झाल्यावर ऑनलाइन शिक्षणाचं प्रमाण थोडं कमी झालं. तरीही कोरोना काळात शिक्षकांनी केलेल्या मेहनतीचं आणि प्रयत्नांचं महत्त्व कमी होत नाही. त्यांच्या मेहनतीमुळेच विद्यार्थ्यांचं शिक्षण अखंड सुरू राहिलं.

ऑनलाइन शिक्षण कसं होतं?

ऑनलाइन शिकण्यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. खाली सोप्या पद्धतीने स्टेप-बाय-स्टेप सांगितलं आहे.

1) शिकण्यासाठी साधनांची गरज असते.

ऑनलाइन शिकण्यासाठी मोबाईल,टॅब, लॅपटॉप किंवा संगणक असणं गरजेचं आहे.
शहरातील अनेक मुलांकडे लॅपटॉप असतो, पण मध्यम व गरीब कुटुंबांमध्ये मुलं मोबाइलवरच शिकतात.

2) इंटरनेट खूप महत्त्वाचं आहे.

ऑनलाइन क्लाससाठी चांगल्या इंटरनेटची आवश्यकता असते.
इंटरनेट नसेल तर क्लासमध्ये प्रवेशच मिळणार नाही आणि शिक्षक काय शिकवत आहेत तेही दिसणार नाही.

3) शिकण्यासाठी अँप किंवा लिंक वापरतात.

शाळा किंवा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी खास अँप वापरतात. उदा. Zoom, Google Meet, Microsoft Teams इत्यादी. विद्यार्थ्यांनी त्या अँपमध्ये लॉग इन करावा लागत.

4) शिक्षक लिंक पाठवतात आणि क्लास सुरू होतो.

शिक्षक क्लासची लिंक पाठवतात. विद्यार्थी त्या लिंकवर क्लिक करून क्लासमध्ये सामील होतात.

5) शिक्षक अँपमुळे अनेक गोष्टी करू शकतात.

आजकालच्या अँपमुळे शिक्षकांना खालील गोष्टी सोप्या झाल्या.

  • उपस्थिती घेणं
  • टेस्ट घेणं
  • विद्यार्थ्यांची वेळ नोंदवणं
  • अनुपस्थित विद्यार्थ्यांची माहिती पाहणं ही कामं खूप सोपी झाली आहेत.

6) ग्रामीण भागाला जास्त अडचणी आल्या.

शहरात इंटरनेट सहज मिळतं, पण ग्रामीण भागात इंटरनेट कमी असल्याने मुलांना ऑनलाइन क्लासेसमध्ये खूप त्रास झाला. त्यांचा मोबाइलमध्ये डेटा असला तरी सिग्नल नीट मिळत नव्हता.

7) कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण फायद्याचं ठरलं.

शाळा बंद असतानाही मुलांचं शिक्षण थांबलं नाही. मुलं घरी सुरक्षित राहून ऑनलाइन शिकू शकली.

ऑनलाइन शिक्षणाच्या विशेषता

ऑनलाइन शिक्षणाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ही पद्धत विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी ठरते.

1) घरबसल्या शिकण्याची सुविधा.

ऑनलाइन शिक्षणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत किंवा वर्गात जाण्याची गरज नसते. फक्त मोबाईलच्या मदतीने ते आपल्या घरातूनच सर्व विषय शिकू शकतात.

2) क्लास चुकला तरी परत पाहू शकता.

कधी इंटरनेट कमी असलं किंवा नेटवर्क गेलं तर क्लास चुकू शकतो. पण ऑनलाइन शिक्षणात ती सगळी शिकवलेली सामग्री परत पाहता येते. यामुळे विद्यार्थ्यांना विषय नीट समजायला मदत होते.

3) दिवसात कमी तास शिकावे लागतात.

शाळेत रोज 6–8 तास वर्ग असतात. पण ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांना साधारण 3–4 तासच क्लासेस करावे लागतात. यामुळे त्यांच्यावरचा अभ्यासाचा ताण थोडा कमी होतो.

4) होमवर्क कमी मिळतो

ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना मिळणारा होमवर्क कमी झाला आहे. यामुळे मुलांना अभ्यासाचा ओझं कमी वाटतं आणि जे आहे ते हलकं वाटतं.

ऑनलाइन शिक्षणाच्या कमतरता

ऑनलाइन शिक्षणाचे फायदे आहेत, पण त्यासोबत काही मोठ्या अडचणीही दिसून आल्या. अनेक विद्यार्थ्यांना या पद्धतीत शिकताना खूप त्रास सहन करावा लागला.

1) इंटरनेट नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहिले.

गावांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे चांगलं इंटरनेट नसल्यामुळे ते ऑनलाइन क्लासमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. यामुळे अनेक मुलांचे शिक्षण बिघडले.

2) गरीब कुटुंबांना मोबाइल आणि इंटरनेट परवडले नाही.

अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या कमजोर असल्याने ते आपल्या मुलांना स्मार्टफोन देऊ शकले नाहीत. तसेच इंटरनेटचा खर्चही जास्त असल्याने ते नियमितपणे रिचार्ज करू शकले नाहीत.

3) स्लो इंटरनेटमुळे क्लासमध्ये अडथळे.

कमी स्पीडच्या इंटरनेटमुळे क्लास जॉइन होण्यास वेळ लागत होता किंवा क्लास वारंवार कट होत होता. यामुळे शिकण्यात खंड पडत होता आणि विद्यार्थी विषय समजू शकत नव्हते.

4) शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद कमी झाला.

ऑनलाइन क्लासमध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांना नीट समजून सांगणं कठीण जात होतं. विद्यार्थ्यांची उत्तरे, त्यांची समज आणि सहभाग कमी झाल्यामुळे शिक्षकांना त्यांचे मूल्यमापन करणे अवघड झाले.

5) शिक्षकांवर कामाचा भार वाढला.

ऑनलाइन पद्धतीमुळे शिक्षकांना जास्त तयारी करावी लागली, जास्त वेळ द्यावा लागला आणि अनेक ठिकाणी त्यांच्या पगारात कपातही झाली. यामुळे त्यांच्यावर ताण वाढला.

6) परीक्षा आणि टेस्ट घेणं कठीण झालं.

ऑनलाइन परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थी सहज चीटिंग करत असल्यामुळे खरं मूल्यमापन होणं कठीण झालं. यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आले होते.

7) पालकांवर आर्थिक भार वाढला.

मोबाइल डेटा, इंटरनेट रिचार्ज, फोन दुरुस्ती… या सर्व खर्चामुळे पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडला आणि त्यांच्या घरखर्चावरही परिणाम झाला.

उपसंहार

याप्रमाणे आपण म्हणू शकतो की ऑनलाइन शिक्षणात काही कमतरता असल्या तरी कोरोना महामारी आणि लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी ऑनलाइन शिक्षण खूप उपयोगी ठरले. या पद्धतीमुळे मुलांची शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि पालकांनाही त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दलची चिंता काही प्रमाणात कमी झाली.

तथापि, मुलं खूप दिवस घरात राहिल्यामुळे त्यांच्या एकूण विकासावर परिणाम झाला आणि अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेतही घट दिसून आली. तरीदेखील, या कठीण काळात ऑनलाइन शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचे योगदान नाकारता येत नाही. त्यांच्या प्रयत्नांमुळेच विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंड चालू राहिले.

Final Words

मित्रांनो, या प्रकारे तुम्ही ऑनलाइन शिक्षणाचे फायदे आणि तोटे यावर एक प्रभावी आणि माहितीपूर्ण निबंध लिहू शकता. ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली? आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा.

Leave a Comment