मराठी सुविचार जे तुम्हाला आत्मविश्वासाने संघर्ष करण्याचे देतील प्रेरणा..!
मित्रांनो आजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जगत असताना नेहमी प्रेरणेची गरज पडत असते, कारण की आपण सर्वजण एका वेळेला येऊन कुठे ना कुठे हार मानतो किंवा आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नाही. मराठी सुविचार तुम्हाला तुमच्या ध्येयाला मिळवण्यासाठी खूप जास्त प्रेरणा देऊ शकतात तसेच ऊर्जेने भरून टाकू शकतात.
लहानपणी शाळेत असताना आपण पाहायचो की शिक्षण दररोज फळ्यावर “आजचा सुविचार” लिहीत असे. शिक्षकाचा उद्देश हाच होता की, आपल्या विद्यार्थ्यांनी त्या सुविचारामधून बोध घ्यावा. आजच्या पोस्टमधील प्रेरणादायी सुविचार तुम्ही तुमच्या प्रियजनांना share करा , जेणेकरून त्यांना त्यांचा संघर्ष करत असताना प्रेरणा मिळेल.
Latest Marathi Suvichar
आजचा सुविचार
वादळात पत्याचे घर बांधले जात नाही, रडून बिघडलेले नशीब सुधरत नाही, जग जिंकण्याचा आत्मविश्वास ठेवा, कारण एका पराभवाने कोणी भिकारी होत नाही, आणि एका विजयाने कोणी सिकंदर होत नाही…!!
तो माणूस खूप मजबूत होतो, ज्याने स्वतःच्या हातांनी स्वतःचे अश्रू पुसले असतात.
साम्राज्य उभारण्यासाठी मनाने नाही तर बुद्धीने चालावे लागते.
ज्या वाटा खूप सुंदर दिसतात, त्या नेहमीच विनाशाकडे घेऊन जातात!
त्यासाठी मेहनत करा मित्रांनो, ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला म्हणाल… कठीण होतं पण मी करून दाखवलं!
marathi suvichar short
पराभवाने कथा संपत नाही, तर नव्या अध्यायाची सुरुवात होते.
प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार कराल, तर स्वतःलाच जखमी कराल.
संधी प्रत्येक सकाळी तुमचं दार ठोठावते, पण तुम्ही झोपलेले असाल तर ती निघून जाईल.
सुरुवात कुठूनही होऊ शकते, फक्त आपली उंच भरारी घेण्याची इच्छा हवी.
गरीब घरात जन्म होणे तुमची चूक नाही, पण गरीबच मरणे ही तुमची चूक आहे.
marathi suvichar images
जर तुम्हाला दुसऱ्यांमध्ये कमी दिसत असेल, तर त्यांच्याशी बोला. पण जर प्रत्येकामध्ये कमी दिसत असेल, तर स्वतःशी बोला.
“माझ्याने नाही होणार” असं विचारू नका, तर “माझ्याशिवाय हे कोण करू शकणार?” असं विचार करा.
प्रत्येक छोटासा बदल यशाच्या मोठ्या प्रवासाचा भाग असतो.
जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, तेव्हा तुमचा सावळा रंगही लोकांना आवडेल.
शांततेने लक्ष्याचा पाठलाग करा, कारण शिकार नेहमी शांततेतच होते, गडगडाटात नाही.
मराठी सुविचार संग्रह
अशक्य हा शब्द फक्त भ्याडच वापरतात; शूर आणि बुद्धिमान लोक स्वतःचा मार्ग बनवतात.
थकला असाल तर थोडा आराम करा, पण कधीही हार मानू नका.
तुमच्या व्यक्तिमत्त्वात इतकं सामर्थ्य असावं की तुमच्या उत्तरानंतर कोणीही प्रश्न विचारू शकणार नाही.
एक मिनिटाचं यशही बर्याच वर्षांच्या अपयशाची किंमत भरून काढतं.
जग तुम्हाला कसं पाहतं हे महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसं पाहता हे महत्त्वाचं आहे.
मराठी सुविचार मोटिवेशनल / marathi suvichar motivational.
स्वतःला कल्पनेमध्ये टॉर्चर करणे बंद कर यार,
तुला माहितीये रियालिटीमध्ये तुझ्या आयुष्यात
जेवढे प्रॉब्लेम नाहीत तेवढे तू करून ठेवले आहे,
तुझ्या overthinking मुळे तुला वाटतंय
तुझं सगळं बरबाद होत चाललंय पण तेवढे
नाहीत तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम, ती नाहीये रिऍलिटी
खरं सांगतो ते वाटतंय आणि तुलाच वाटतंय
तू एकटाच आहे का काही प्रॉब्लेममध्ये पडलेला
नाही ना !
खूप लोक प्रॉब्लेममध्ये पडले आणि बाहेर आले
तू पण यातून बाहेर येशील…..
तुझे पण दिवस बदलणार ,तुझे पण चांगले होणार
पण पहिले स्वतःला सांग ,भीती वाटतीय
स्वतःला सांग ” माझं चांगलंच होणार”
आनंदाचे खरे मालक बना, कारण इथे आनंद देणारे कमी, पण दुःख देणारे जास्त भेटतात.
“वेळ तुमचा गुरू आहे”, जो शिकवतो की, यश न मिळाल्यास तुमचं कोणीच आपलं राहणार नाही.
मार्ग उघडतील, फक्त अडथळ्यांना भिडा आणि जिद्दीने उभे रहा.
नेहमी स्वतःकडे पहिले पाहा, कारण चुकी दुसऱ्यात शोधणे योग्य नाही.
तरुणपणाची किंमत, आवडत्या गोष्टींवर त्यागाची मागणी करते, तीच पुढे योग्य वाट दाखवते.
मराठी सुविचार स्टेटस / marathi suvichar status.
वेळ वाईट असेल तर मेहनत करा, आणि वेळ चांगला असेल तर इतरांची मदत करा.
नशीब बदलेल, चित्रही बदलेल, फक्त हिम्मत सोडू नकोस, प्रवासाच्या मार्गावर मेहनत करा; एक दिवस आयुष्यही बदलेल.
वेळेला समजणे ही शहाणपणाची खूण आहे, पण वेळेत समजणं ही जबाबदारी आहे.
ध्येय मिळेलच, भटकंतीतून का होईना, भरकटले तेच आहेत जे घरातून निघालेच नाहीत.
भूतकाळाकडे बघून पश्चात्ताप करण्यापेक्षा, भविष्याकडे पाहून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणं अधिक चांगलं आहे.
marathi suvichar for students.
मिठासारखा स्वभाव ठेवा; ना कुणी जास्त वापरू शकेल आणि ना तुमच्याशिवाय राहू शकेल.
आयुष्य तुझं, स्वप्नं तुझी, ध्येयं तुझी, हार-जीत आणि मेहनत सुद्धा तुझी आहे. मग या फालतू लोकांच्या बोलण्यावरून हार मानणे काय आहे?
जे मिळालंय त्याचा आभारी रहा, आणि जे नाही मिळालं त्याचा संयम ठेवा.
काही काळ शांत राहा, कारण आवाज उठवण्याची वेळ नक्की येईल.
नशिब मेहनतीने बदलतं, फक्त विचार करण्याने नाही. म्हणून उठ, तुझ्या ध्येयावर काम कर, कारण वेळ भराभर जातोय.
मराठी सुविचार नवीन
जेव्हा एकटं चालायला लागलो, तेव्हा समजलं की मीही कुणापेक्षा कमी नाही.
ध्येय मिळवण्याची आशा कधीही सोडू नका, कारण सूर्य मावळल्यावरच पुन्हा सकाळ होते.
वेळ माणसाला यशस्वी करत नाही, पण वेळेचा योग्य वापरच माणसाला यशस्वी करतो.
ज्याचा गुरु वेळ आहे त्याने प्रत्येक धडा शिकला आहे, त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही.
आता खूप पळालास जगाच्या मागे-मागे, आता स्वतःला पुढे ठेवायची वेळ आली आहे. जगाशी मैत्री खूप झाली, आता स्वतःशी स्वतःची मैत्री कर.
काहीतरी करून दाखवण्यासाठी हवे असते मन, हवे असते दृढ निश्चयाचे भांडवल; साधने सर्व आपोआपच मिळतील.
जीवनाची लढाई स्वतःच लढावी लागते; लोक सोबत कमी देतात आणि सल्ले जास्त देतात.
निराश होऊ नकोस, तुझं अस्तित्व छोटं नाही; तू ते करू शकतो जे कुणीही कल्पनेतही आणलं नाही.
हे तुझेच जीवन आहे, जे तुलाच बदलायचे आहे; कालपेक्षा जास्त, आज तुला जिंकायचं आहे.
जिंकणं नक्की असेल तर भ्याड सुद्धा लढतात; शूर तोच असतो जो हार नक्की असूनही मैदान सोडत नाही.
रूप आणि पैशावर कधीही गर्व करू नका, कारण गरीबी आणि आजारपण कधीही विचारून येत नाहीत.
जीवन खूप सोपं होतं, जेव्हा तुम्हाला याचा फरक पडत नाही की लोक काय म्हणतील.
नेहमी लक्षात ठेवा, लोणी लावणाऱ्यांच्या हातात कायमच चाकू असतो.
“लोक काय म्हणतील” यावर विश्वास ठेवत नाही, कारण आयुष्य माझं आहे, लोकांचं नाही.
सगळ्यांचा सन्मान करा, पण तितकीच इज्जत द्या, जितकी तुम्हाला मिळते.
वेळ तुमचाच आहे. हवे तर सोनं बनवा, नसेल तर झोपण्यात घालवा.
प्रत्येक वेदना एक धडा देते आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो.
स्वाभिमान कधीही निष्ठेशी तडजोड करत नाही; वेळ वाईट आला तर सहन करू, पण कधीच झुकणार नाही.
कोणाला समजवण्यात वेळ वाया घालवू नका कारण समजावणं फुकट जातं; काही लोक फक्त स्वतःच्या सोयीनुसार ऐकतात.
यश हे जीवनात आवश्यक आहे… कारण जर तुम्ही यशस्वी नसाल, तर तुमचं स्वतःचंही कोणी नसतं!
“स्लो सक्सेस कॅरेक्टर घडवतं, फास्ट सक्सेस अहंकार वाढवतं.”
रतन टाटा
संघर्षाशिवाय जीवन अपूर्ण आहे.
तक्रार दुसऱ्यांकडून नाही, स्वतःकडून आहे, कारण मी तिथे पोहोचलेली नाही जिथे मला असायला हवं होतं!
केवळ हालचाली दिसत नाहीत याचा अर्थ असा नाही की काही होत नाही.
कशासाठी रडणं-धडपडणं मित्रांनो? वरच्याने दिलेली आयुष्य, तो कधी परत घेईल काही माहित नाही, म्हणून जगत असताना नेहमी हसत राहा.
कोण काय करतंय, कसं करतंय, का करतंय, या सगळ्यांपासून जितकं दूर राहाल, तितकं आनंदात राहाल.
मेहनत करणं गरजेचं असतं मित्रांनो, हातात घड्याळ बांधल्यानं वेळ येत नाही.
संगतीचा परिणाम टळत नाही! ज्या लोकांमध्ये आणि वातावरणात तुम्ही राहता, ते तुमच्यावर परिणाम करतं. म्हणूनच मित्र आणि संगती काळजीपूर्वक निवडा.
मराठी सुविचार मोठे
लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी टिंगल करतील, आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातील! लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. तुम्हाला पाहिजे ते करा, जे तुम्हाला आनंद देतं. कारण आयुष्य तुमचं आहे, लोकांचं नाही!
कमजोरी कुणाचीच नसते… परिस्थितीच लोकांना कमकुवत बनवते, आणि नालायक लोक याचा गैरफायदा घेतात, स्वत:ला सिंह समजतात.
जीवनातील प्रत्येक नवीन दिवस आपल्याला चांगलं होण्यासाठी नवा संधी देतो. त्या संधीचं चीज करा, ती वाया जाऊ देऊ नका.
मनातील गुपितं प्रत्येकाला सांगू नका! कधी मित्र शत्रू होईल सांगता येत नाही. मनातील प्रत्येक गोष्ट सावधगिरीनेच व्यक्त करा.
स्वतःविरोधातील गोष्टी शांतपणे ऐका… वेळच सर्वात चांगले उत्तर देते, यावर विश्वास ठेवा!
स्वतःच्या चुका मान्य करणारा व्यक्ती… स्वतःशी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला कोणीही हरवू शकत नाही.
marathi suvichar for school
सर्वप्रथम स्वतःला आनंदी ठेवा! जगाचं विसरा, कारण दररोज तुम्हाला आरशात दिसणाऱ्या व्यक्तीचं सुख सर्वात महत्त्वाचं आहे.
ज्यांनी तुम्हाला विसरलंय… त्यांना फक्त त्यांच्या गरजेचा दिवस येऊ द्या, ते तुम्हाला नक्कीच आठवतील.
ज्यांच्याकडे एकटं चालण्याचा धीर असतो… एक दिवस संपूर्ण गर्दी त्यांच्या मागे चालते.
नुसते कारणे देणारे नेहमी हरतात… आणि विजेते कधीच बहाणे शोधत नाहीत.
स्वतःची तुलना इतरांशी करू नका… प्रत्येक फळाचं चव वेगळी असते.
मराठी सुविचार अर्थासहित / marathi suvichar with meaning.
स्वप्न मोठी बघा… चंद्राला गवसणी नाही घातली तरी ‘आकाश’ गाठाल.
यश म्हणजे संघर्षाची कथा… ती एका अपयशी माणसाच्या जिद्दीची कहाणी आहे.
स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहाणे नाही, वेडे व्हावे लागते.
मेहनतीने मन शांत होतं… आणि सत्य बोलण्याने हृदय स्वच्छ राहतं.
संघर्षच व्यक्तीला मजबूत बनवतो… मग तो कितीही कमकुवत का असेना!
संघर्षाची क्षमता वाढवा… यश तुमचं होणारच आहे.
थोडक्यात
आजचा पोस्टमधील मराठी सुविचार तुम्हाला आवडले असतोल आणि तुम्हाला त्यातून खूप काही शिकायला मिळाले असेल अशी अपेक्षा करतो.